Friends Marathi Poem ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....
तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...
तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....
टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..
Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...
तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...
खरी मैत्री Professional frenz मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
yaar i like it this poem
ReplyDeleteniceeeeeeeeeeeeeeeeee
Thanks Rahul,
ReplyDeleteReal Life is change after education. The responsiblities make us bound to our duety and we get lost in it. But whenever we got time the rememberence of those days come behind the eyes.